Header Ads

समरजितसिंह घाटगेंची भाजपमध्ये घरवापसी; कोल्हापूरच्या राजकारणात नवा ट्विस्ट. राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का; भाजपची जिल्ह्यात ताकद वाढणार?

 समरजितसिंह घाटगेंची भाजपमध्ये घरवापसी; कोल्हापूरच्या राजकारणात नवा ट्विस्ट.

राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का; भाजपची जिल्ह्यात ताकद वाढणार?

-----------------------------
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 

संस्कार कुंभार.

-------------------------------

कोल्हापूर :

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश करत घरवापसी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोबतची साथ सोडत घाटगे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.

मुंबईत पार पडलेल्या या प्रवेश सोहळ्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक आणि माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या उपस्थितीत घाटगे यांनी अधिकृतपणे पक्षप्रवेश केला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घाटगे यांच्या प्रवेशामुळे पक्ष संघटनात्मकदृष्ट्या अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला. तर समरजितसिंह घाटगे यांनी “आता कोणतेही प्रयोग नाहीत; पक्ष देईल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार,” अशी भूमिका स्पष्ट केली.

विधानसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर झालेल्या या राजकीय घडामोडीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत असून, विशेषतः ग्रामीण भागात भाजपला याचा फायदा होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

No comments:

Powered by Blogger.