Header Ads

अधिक मासात भक्तीचा महासागर; श्री गजानन विजय ग्रंथ पारायणास साडेतीनशे भक्तांची उपस्थिती

 अधिक मासात भक्तीचा महासागर; श्री गजानन विजय ग्रंथ पारायणास साडेतीनशे भक्तांची उपस्थिती 


अधिक मास आणि गुरुपुष्यामृत योगाच्या दुर्मिळ संगमात नवीन वाशी नाका परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. श्री गजानन महाराजांच्या कृपेचा लाभ घेण्यासाठी तब्बल साडेतीनशे महिला व पुरुष भक्तांनी एकत्र येत श्री गजानन विजय ग्रंथ एक दिवसीय पारायण सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

यावर्षी प्रथमच आलेल्या अधिक मासात दिनांक 21 मे रोजी गुरुवारचा शुभ दिवस आणि गुरुपुष्यामृत योग साधून नवीन वाशी नाका येथील दिंडोर्ले हॉलमध्ये हा भव्य धार्मिक सोहळा पार पडला. फुलेवाडी येथील विद्याताई सावंत यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात श्री गजानन महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली.

यानंतर सुरू झालेल्या श्री गजानन विजय ग्रंथ पारायणात परिसरातील भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला. संपूर्ण परिसर “गण गण गणात बोते”च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. महिलांचा उत्साह आणि युवकांची सेवाभावाने केलेली धावपळ यामुळे सोहळ्यास विशेष रंग चढला.

पारायणानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक भक्तांनी या आध्यात्मिक पर्वाचा लाभ घेत समाधान व्यक्त केले. “अधिक मासातील हे पारायण भक्तांना आत्मिक ऊर्जा देणारे ठरले,” अशी भावना संयोजकांनी व्यक्त केली.

No comments:

Powered by Blogger.