Header Ads

कळे परिसरातील दोन शाळांचा दहावी परीक्षेत शंभर टक्के निकाल; यशाची परंपरा कायम

 कळे परिसरातील दोन शाळांचा दहावी परीक्षेत शंभर टक्के निकाल; यशाची परंपरा कायम.




----------------

कळे प्रतिनिधी

साईश मोळे.

----------------

कळे परिसरातील दोन नामांकित शाळांनी दहावी बोर्ड परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत उज्ज्वल यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण यशामुळे शाळा, शिक्षक व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कै. आप्पासाहेब रघुनाथराव माने शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भैरव विद्यानिकेतन आसगाव शाळेचा इयत्ता दहावी सेमी माध्यमाचा निकाल 100 टक्के लागला असून सलग 11 व्या वर्षी शाळेने ही गौरवशाली परंपरा कायम राखली आहे.

शाळेतील गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे —

राजनंदिनी गणपती मोळे – 90 टक्के,

सिद्धी सागर मोळे – 89 टक्के,

गौरी दिपक मोळे – 88.60 टक्के,

मयूर पांडुरंग टिंगे – 88 टक्के,

अवधूत उदय पाटील – 87.60 टक्के.


तसेच श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ पणुत्रे संचलित विठ्ठल पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, कळे (ता. पन्हाळा) या शाळेचाही इयत्ता दहावी एसएससी परीक्षेचा सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाचा निकाल 100 टक्के लागला असून शाळेने सलग 18 वर्षे शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.

या शाळेतील गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे —

ज्ञानेश्वरी सदाशिव नाईक – 94.40 टक्के,

त्रिवेणी धनाजी पवार – 91.20 टक्के,

आदिराज शरद पाटील – 85.20 टक्के.

दोन्ही शाळांतील यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची मेहनत महत्त्वाची ठरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

No comments:

Powered by Blogger.