राधानगरी धरणात 3.27 टीएमसी पाणीसाठा शिल्लक; काटकसरीने वापराचे आवाहन
राधानगरी धरणात 3.27 टीएमसी पाणीसाठा शिल्लक; काटकसरीने वापराचे आवाहन.
--------------------------------------
राधानगरी प्रतिनिधी : विजय बकरे.
---------------------------------------
राधानगरी येथील लक्ष्मी तलाव अर्थात राधानगरी धरणामध्ये 21 मे 2026 अखेर 3.27 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती धरणाचे शाखा अभियंता निरुखे यांनी दिली. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणीसाठ्याचा जपून वापर करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.
धरण प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 21 मे रोजी सकाळी 6 वाजता धरणाची पाण्याची पातळी 307.73 फूट इतकी नोंदविण्यात आली. धरणामध्ये एकूण 3027.04 दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध असून तो सुमारे 3.027 टीएमसी इतका आहे.भोगावती नदीकाठच्या गावांतील नागरिक तसेच शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, असे आवाहन शाखा अभियंता निरुखे यांनी केले. आगामी पावसाळा सुरू होईपर्यंत उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

No comments: