छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान अभियानातून १०३३ नागरिकांना योजनांचा लाभ; प्रशासकीय यंत्रणा गतिमान करण्याचे तहसीलदार अनिता देशमुख यांचे आवाहन”
छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान अभियानातून १०३३ नागरिकांना योजनांचा लाभ; प्रशासकीय यंत्रणा गतिमान करण्याचे तहसीलदार अनिता देशमुख यांचे आवाहन”
विजय बकरे.
राधानगरी प्रतिनिधी.
------------------------------
छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान अभियानांतर्गत शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सुलभ आणि प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी प्रशासकीय यंत्रणा अधिक गतिमान करण्याचे आवाहन तहसीलदार अनिता देशमुख यांनी केले. शुक्रवारी (दि.१५) नवी पेठ येथील अंबाबाई मंदिर परिसरात आयोजित अभियान शिबिरात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.
या अभियानाअंतर्गत विविध विभागांच्या माध्यमातून तब्बल १०३३ नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. शिबिरात पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले तसेच विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर दुय्यम निबंधक दिग्विजय आसवले, तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र शेट्टये, मंडल अधिकारी सीमा मोरे तसेच परिसरातील ग्रामपंचायतींचे सरपंच व मान्यवर उपस्थित होते. जि.प. सदस्य अभिजीत तायशेटे आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक शेट्टी यांनीही मनोगत व्यक्त केले.
अभियानांतर्गत कृषी विभागामार्फत पावर ट्रेलर व ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. तसेच सातबारा प्रमाणपत्र, वारसा प्रमाणपत्र, फेरफार नोंदी, उत्पन्न दाखले, आयुष्यमान गोल्डन कार्ड, जिवंत सातबारा, वारसा नोंद दुरुस्ती आदी विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. याचबरोबर महसूल, कृषी, आरोग्य, एकात्मिक बाल विकास, पुरवठा, भूमी अभिलेख, आधार कार्ड विभागांसह विविध शासकीय विभागांच्या योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली.
या अभियानासाठी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार मंडल अधिकारी सीमा मोरे यांनी मानले.
फोटो ओळ :
छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान अभियानांतर्गत कृषी विभागाच्या लाभातून पात्र शेतकरी महेश पाटील यांना ट्रॅक्टर प्रदान करताना तहसीलदार अनिता देशमुख, जि.प. सदस्य अभिजीत तायशेटे, सामाजिक कार्यकर्ते दीपक शेट्टी व अन्य मान्यवर.

No comments: