इंधन दरवाढ रोखा अन्यथा महागाईच्या आगीचा भडका उडणार....कागल काँग्रेसचा इशारा..
इंधन दरवाढ रोखा अन्यथा महागाईच्या आगीचा भडका उडणार....कागल काँग्रेसचा इशारा....महागाईचा भडका रोखण्यासाठी इंधन दरवाढ थांबवा...अन्यथा कागल काँग्रेसचा तीव्र आंदोलनाचा इशारा..
-------------------------------`--पेट्रोल , डिझेल दर व पुरवठा यावर केंद्र शासनाकडून नियंत्रण नसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास, आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे. याला केंद्र सरकारचे धोरण , गलथानपणा कारणीभूत आहे. देशाचे प्रधान मंत्री नरेंद्र मोदी तसेच मंत्रिगण यांच्या कथित फाईल उघड्या होण्याच्या भीतीमुळे भारत देशाचे सार्वभौमत्व गुंडाळून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या दबावाखाली केंद्र सरकार अमेरिके पुढे लोटांगण घालत आहे. केंद्र सरकारला रशिया व इराणकडून इंधन पुरवठा साठी अमेरिकेकडून लाचारीने परवानगी घ्यावी लागत आहे . देशात अराजकता माजत आहे. त्यामुळे केंद्र शासनाने नजीकच्या काळात इंधन धोरणात बदल करून पेट्रोल डिझेल याचे दर स्थिर व पुरवठा सुरळीत ठेवावा. अन्यथा भविष्यात केंद्र शासना विरोधात काँग्रेस पक्ष व सामान्य जनतेस आंदोलनाचा सार्वत्रिक उठाव करावा लागेल.
अशा गंभीर इशाऱ्याचे निवेदन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड दयानंद पाटील- नंद्याळकर यांच्यासह किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष सागर कोंडेकर, प्रदेश सदस्य विनायक घोरपडे, ईगल प्रभावळकर, सौ.दिपाली आवळे, रणजीत कटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार अमरदीप वाकडे यांना दिले. निवेदनाच्या प्रती खासदार शाहूजी छत्रपती, काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांना दिल्या आहेत.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, पेट्रोल डिझेल दरवाढ व तुटवडा मुळे अनेक व्यवसायिकांनी महागाईमुळे वाढविलेल्या विक्री दरामुळे शहरी व ग्रामीण भागातील सर्वसामान्य मध्यमवर्गीय, गरीब व झोपडपट्टीतील जनता बेजार झाली आहे. इंधन दरवाढीमुळे दूध, फळे ,भाजीपाला, कडधान्य, जीवनावश्यक वस्तू यांचे दर महागले आहेत. तसेच इंधन दरवाढीचा फटका किराणा दुकानदार , छोटे -- मोठे व्यावसायिक यांना बसल्यामुळे महागाईत प्रचंड वाढ झाली आहे. विशेषतः महिला- भगिनींना गगणाल्या भिडलेल्या महागाईची प्रापंचिक झळ बसत आहे.
घरगुती व व्यावसायिक गॅसचे वाढलेले दर , साठेबाजी, कृत्रिम टंचाई , काळया बाजारातील विक्री यामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रापंचिक ताळेबंद बिघडून आवाक्याच्या बाहेर गेलेला आहे.
खरीप हंगामाच्या तोंडावर शेती मशागतीच्या कामासाठी ट्रॅक्टर,जेसीबी, यांत्रिक उपकरणे साठी लागणाऱ्या डिझेल च्या दरवाढ व तुटवड्यामुळे मशागतीच्या वाढलेल्या आवाक्या बाहेर खर्चाचा आर्थिक भुर्दंड बळीराजाला सोसावा लागत आहे. या कारणामुळे शेत - शिवारे पेरणीसाठी विलंब व खोळंबा होत आहे. शेतमशागतीसाठी शेतकऱ्यांना वेगळा डिझेल कोटा द्यावा.
् ्दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी कागल बस स्टॅन्ड येथील पेट्रोल पंपावर निदर्शने व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर जनजागृती अभियान केले. यावेळी राहुल घराळ , राजेंद्र शिंदे,अमर चौगुले , रणजीत पाटील ,दीपक शेणवी , गणेश पाटील, बाबुराव पाटील,अनिल सपकाळ, राजेंद्र बागल, वैभव सनगर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments: