Header Ads

मलकापूर परिसरात 'महाराजस्व समाधान शिबिरा'ला उदंड प्रतिसाद;

 मलकापूर परिसरात 'महाराजस्व समाधान शिबिरा'ला उदंड प्रतिसाद; शेकडो ग्रामस्थांना एकाच छताखाली शासकीय योजनांचा लाभ.

------------------------
मलकापूर रोहित पास्ते:
-------------------------

 महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत मलकापूर मंडळात आयोजित 'समाधान शिबीर' मोठ्या उत्साहात पार पडले. "रयतेच्या काडीलाही धक्का न लावता, रयतेची सेवा हेच आमचे कर्तव्य" या ब्रीदवाक्याला स्मरून प्रशासनाने एकाच छताखाली शेकडो नागरिकांना विविध दाखले आणि लाभ पत्रांचे थेट वाटप केले.

चनवाड फाटा (येळाणे) येथील संकल्प सिद्धी हॉलमध्ये शुक्रवार, दि. १५ मे रोजी हे शिबीर पार पडले. या मोहिमेअंतर्गत १ मार्चपासून प्रशासनाने केलेल्या कामाचा लेखाजोखा व दाखल्यांचे वाटप यावेळी करण्यात आले. यावेळी बोलताना प्रांताधिकारी समीर शिंगटे म्हणाले तळागाळातील घटकांना या योजनेचा लाभ मिळावा हेच या योजनेची उद्दिष्ट असून याचा लाभ सर्वांनी घ्यावा. असे आवाहन त्यांनी यावेळी केले‌. यावेळी स्वागत व प्रास्ताविक तहसीलदार सीमा सोनवणे यांनी केले. यावेळी जिल्हा मुद्रांक अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, जि. प. सदस्य सर्जेराव पाटील, जि. प .सदस्य स्नेहल वेल्लाळ,  सभापती प्रियंका भोसले यांनी मनोगत व्यक्त केली.

 यावेळी खालील योजनांचा लाभ जनतेने घेतला योजनांचा लाभ:

 महसूल विभाग लक्ष्मीमुक्ती, जिवंत सातबारा आणि ५/१२ दुरुस्तीकरणासह एकूण ९ फेरफार निर्गत करण्यात आले.

 दाखल्यांचे वाटप अधिवास (डोमिसाईल), उत्पन्न आणि जातीचे दाखले अशा एकूण १९६ विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

 सामाजिक न्याय विभाग संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेच्या ४९ लाभार्थ्यांना मंजुरीपत्रे देण्यात आली.

 पुरवठा विभाग ९७ कुटुंबांना नवीन शिधापत्रिका (रेशन कार्ड) सुपूर्द करण्यात आल्या.

 आवास व कृषी: प्रधानमंत्री आवास योजनेतून ३६ घरांना मंजुरी, तर १३२ शेतकऱ्यांना कृषी पंप, रोटाव्हेटर आणि पाईपलाईनचा लाभ देण्यात आला.

 आरोग्य व महिला कल्याण:एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत ९ महिलांना ‘बेबी किट’ वाटप करण्यात आले, तर आयोजित रक्तदान शिबिरात ३७ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी सर्व शासकीय सेवा गावातच एका छताखाली उपलब्ध झाल्यामुळे मलकापूर मंडळातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी  मलकापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मा.सौ. रश्मी कोठावळे, उपनगराध्यक्ष मा.श्री. दिलीप पाटील, विरोधी पक्षनेते मा.श्री. संजय मोरे, यावेळी नायब तहसीलदार प्रदीप जाधव, नरेंद्र गायकवाड, मंडल अधिकारी आदित्य दाभाडे, सहाय्यक गट विकास अधिकारी सुनील पाटील, कृषी अधिकारी  नीलम चाकणे, महसूल अधिकारी संदीप कांबळे राहुल जारवाल, प.स.सदस्य डॉ धनश्री पाटील , प स सदस्य राजेश पाटील, रमेश दादा नाईक नगरसेवक, यांच्यासह सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

No comments:

Powered by Blogger.