शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव न मिळाल्यास आंदोलन तीव्र करणार दत्ता पवार.
शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव न मिळाल्यास आंदोलन तीव्र करणार दत्ता पवार
-------------------------------------
मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते:
-------------------------------------
शाहुवाडी-केंद्र व राज्य शासनाच्या निषेधार्थ शाहुवाडी तहसीलदार कार्यालय समोर आज शिवसेना तालुकाप्रमुख दत्ता पवार यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसी लाक्षणीय उपोषण शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आले . यावेळी बोलताना शिवसेना तालुका प्रमुख दत्ता पवार म्हणाले की शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला केंद्र व राज्य शासन भाव देत नसून शेतकऱ्यांच्या कांद्याला 50 पैसे असा दर मिळत आहे .शेतकरी उदासीन झाला आहे शेतकरी आत्महत्या करतो परंतु भांडवलदारांचे हित जपणाऱ्या केंद्र व राज्य शासनाला शासनाचे काही देणे घेणे नाही .आदानी अंबानी यांच्यासाठी केंद्र व राज्य सरकार असून अदानी अंबानी यांच्या घशात घालून वीज वितरण कंपनींना वीज पुरवायचे काम दिले आहे. त्यांच्या बड्या बड्या कंपन्यांना कर्जमाफी दिली जात असून शेतकऱ्यांना मात्र कर्जमाफी नाही. शासनाकडे शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही शेतीला लागणारी खते अव्वाच्या सव्वा दराने होत असून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. बाराशे ते तेराशे रुपये ची बॅग आज 1800 ते २२००रुपये दराने खरेदी करावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी संपूर्ण कोलमडला आहे. आम्ही दिलेल्या निवेदनाद्वारे दिलेल्या मागणीचे सरकारने विचार करावा अन्यथा पुढील काळात आंदोलन तीव्र केले जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला असेही यावेळी शिवसेना व ( उबाठा) गटाचे माजी संपर्क प्रमुख यशवंत पाटील, शिवसेना तालुका दत्ता पवार, उपतालुका प्रमुख निवास कदम योगेश कुलकर्णी, युवा सेना तालुकाप्रमुख जयसिंग डाकरे,विभाग प्रमुख हेमंत पाटील, शाखाप्रमुख प्रवीण पाटील, शाखाप्रमुख लक्ष्मण बेडसे, बापू लाळे, यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी या उपोषण स्थळी शेतकरी मोर्चाचे नेते आबासाहेब पाटील, कॉम्रेड भाई भारत पाटील, राजाराम मगदूम ,पंचायत समिती सदस्य डॉ. धनश्री पाटील यांनी भेट दिली.

No comments: