Header Ads

कुरणी बंधाऱ्याचे काम रखडले; नागरिकांमधून संताप

 कुरणी बंधाऱ्याचे काम रखडले; नागरिकांमधून संताप

------------------------------
मुरगूड/ जोतीराम कुंभार.
-------------------------------

कुरणी बंधाऱ्याच्या पिलरचे बांधकाम कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी झिरपत असून बंधाऱ्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत नागरिकांनी संबंधित विभागाला निवेदन दिल्यानंतर दुरुस्तीचे काम ठेकेदाराला देण्यात आले. मात्र काम सुरू झाल्यानंतरही कोणतीही गती दिसून येत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

बांधकामासाठी नदीमध्ये जाण्यासाठी मातीचा रॅम्प तयार करण्यात आला असला तरी प्रत्यक्ष काम रखडल्याचे दिसून येत आहे. येत्या काही दिवसांत पावसाळा सुरू होणार असल्याने हे काम पूर्ण होणे कठीण बनणार आहे. सध्या पडलेल्या भागातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने उर्वरित पिलरही कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन ठेकेदाराकडून काम तातडीने पूर्ण करून घ्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. लाखो रुपयाचे हे काम विलंब झाल्यास एक काम पावसाळ्यानंतरच पूर्णत्वा जाण्याच्या किती आहे मात्र पावसाळ्याच्या ठिकाणी मोठा पूर आल्यास हा बंधारा वाहून जाण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे त्यामुळे संबंध ठेकेदारांनी या ठिकाणी भेट देऊन पुन्हा कामाची गती वाढवावी अशी मागणी देखील नागरिक करताना दिसून येत आहेत

No comments:

Powered by Blogger.