Header Ads

अजिंक्य सोशल फाउंडेशनतर्फे 'महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२६' प्रदान.

अजिंक्य सोशल फाउंडेशनतर्फे 'महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२६' प्रदान.

--------------------------------
 पुणे जिल्हा प्रतिनिधी.
 कैलास बोडके.
---------------------------------

आळेफाटा (प्रतिनिधी)अजिंक्य सोशल फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन प्रतिष्ठेचा 'महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२६' प्रदान करण्यात आला. वाकड येथील स्व. लक्ष्मणभाऊ जगताप सभागृह, कावेरी नगर येथे झालेल्या समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचे माजी अध्यक्ष व दिपज्योत मेडिकल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक सोनवणे व प्रतिभा सोनवणे तसेच अलायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवडचे माजी अध्यक्ष आण्णासाहेब मटाले  मोनिका मटाले यांना यावर्षीचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज आणि वृक्षदायी संस्थेच्या माध्यमातून देहू ते पंढरपूर पालखीमार्गावर ९५७६ वृक्षांची लागवड व संवर्धन करणारे ह.भ.प.  शिवाजीमहाराज मोरे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी राजेंद्र मोरे, डॉ अशोक सोनवणे, ॲड विनायक गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते व महावीर एज्युकेशन सोसायटीचे तसेच रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचे संस्थापक अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया, अजिंक्य सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष  सचिन पवार, सचिव बाळासाहेब राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक  सचिन पवार यांनी केले. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणे हीच संस्थेची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Powered by Blogger.