Header Ads

मनसे रेंदाळ शहर अध्यक्ष पदी लखन लोंढे यांची निवड...

मनसे रेंदाळ शहर अध्यक्ष पदी लखन लोंढे यांची निवड.
--------------------------------

रेदाळ. प्रतिनिधी .

सचिन कुंभार.

---------------------------------

महाराष्ट्र नवनिर्माण सेना हातकणंगले तालुक्यातील पदाधिकारी यांची निवड करण्यात आली यावेळी रेंदाळ येथील लखन लोंढे हे सामाजिक कार्य, युवकांच्या अडचणीत नेहमी सक्रिय असतात तसेच पक्ष वाढीसाठी युवकांना संघटित करून पक्षाचे काम तळमळीने करतात त्यामुळे इचलकरंजी येथे निवडी प्रसंगी रेंदाळ येथे संघटनात्मक वाढीसाठी बळ देण्यासाठी नवीन फेर निवड करण्यात आली व त्यांच्यावर शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. इचलकरंजी येथे पार पडलेल्या बैठकीत कोल्हापूर जिल्हा संपर्क अध्यक्ष यशवंत किल्लेदार, नंदकुमार चिल्ले तसेच कोल्हापूर जिल्हाध्यक्ष दौलतराव पाटील, हातकणंगले तालुका अध्यक्ष वैभव भोसले यांच्या हस्ते निवड करण्यात आली. यावेळी वडगावचे माजी उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण, जिल्हा सचिव प्रतापराव पाटील, इचलकरंजी शहराध्यक्ष रवी गोंदकर रेंदाळ मधील  सचिन सुतार ,शाहू पाटील अवधूत गळदगे ,अभिजीत घोडेस्वार ,ओमकार पाटील भरत मुदगल ,राजू जगदाळे सोमांना पुजारी ,आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.