Header Ads

विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासक्रमाबरोबरच जीवनाच्या विविध क्षेत्रात दैदिप्यमान यश संपादन करावे - बी आर अकिवाटे

विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासक्रमाबरोबरच जीवनाच्या विविध क्षेत्रात दैदिप्यमान यश संपादन करावे - बी आर अकिवाटे

--------------------------------

कुडित्रे प्रतिनिधी

 प्रा पी जे पाटील

---------------------------------

        कुडित्रे ता. करवीर येथील डी सी नरके विद्यानिकेतन व ज्युनिअर कॉलेजमध्ये महाराष्ट्र दिन व कामागार दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी वार्षिक परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना देण्यात आला. महाराष्ट्र ही संतांची, शूर विरांची ,कष्टकरी शेतकरी व श्रमिकांची भूमी असून आजच्या युवा पिढीने त्यांच्या कार्याचे स्मरण ठेवून विविध क्षेत्रात आपल्या बुद्धी कौशल्याच्या बळावर शालेय अभ्यासक्रमातील उज्ज्वल यशाबरोबरच जीवनाच्या विविध क्षेत्रात दैदिप्यमान यश संपादन करावे असे आवाहन यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री बी आर अकिवाटे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या अधक्षस्थानी प्राचार्य श्री डी एस चौगले सर होते. यावेळी त्यांचे शुभहस्ते वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत,यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.

          या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा एम बी मोहिते यांनी केले. विद्यार्थी मनोगत ऋतुजा बरगे, ज्योती काळे, दिव्या पाटील, सायली मोहिते यांनी व्यक्त केले. प्रा जे एम आंगठेकर, बी व्ही माळी सर यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिन याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रीमती जे डी लव्हटे मॅडम यांनी तर आभार प्रा सौ एन ए पाटील मॅडम यांनी मानले. यावेळी पर्यवेक्षक एस जे डुबल,सर्व शिक्षक, 

शिक्षेकेतर कर्मचारी,सर्व विद्यार्थी,विद्यार्थींनी उपस्थित होत्या.

No comments:

Powered by Blogger.