बच्चे सावर्डे : पंतआण्णा फौंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार.
बच्चे सावर्डे : पंतआण्णा फौंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार.
----------------------------------------
बच्चे सावर्डे प्रतिनिधी - सुनिल पाटील .
------------------------------------------
पंतआण्णा फौंडेशनच्या वतीने श्रीमती भा.रा. यादव हायस्कूल, बच्चे सावर्डे येथे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, पुस्तके, वह्या, कंपास पेटी, वॉटरबॉटल, छत्री तसेच शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. फौंडेशनच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळून त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळणार असल्याचे मत फौंडेशनचे अध्यक्ष सुनिल सावंत यांनी यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमात शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक पी. आर. पाटील सर, बी. आर. बच्चे सर व शिक्षकेतर कर्मचारी दिलीप घोलप यांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मुख्याध्यापक ए. बी. पाटील सर, एस. एस. हजारे सर यांचाही शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शिक्षणाला हातभार लावण्यासाठी फौंडेशनने राबवलेल्या या उपक्रमाचे सर्व मान्यवरांनी कौतुक केले.
यावेळी फौंडेशनचे अध्यक्ष सुनिल सावंत, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, कार्याध्यक्ष दत्तप्रसाद बच्चे, मुख्याध्यापक ए. बी. पाटील सर, एस. एस. हजारे सर, संजय गुरव सर, चंद्रकांत पाटील सर, सुशांत बच्चे यांच्यासह शाळेचे शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments: