Header Ads

गड मुडशिंगी येथे बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

 गड मुडशिंगी येथे बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी.

-------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी.

संस्कार कुंभार.

-----------------

गड मुडशिंगी : बौद्ध समाज गड मुडशिंगी यांच्या वतीने बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महानिर्वाण या तिन्ही घटना एकाच दिवशी घडल्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे. याच दिवशी १ मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन यांचेही औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदनेने करण्यात आली. यावेळी तानाजी गोंधळी यांनी बुद्धांचे विचार समाजातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचे सांगितले. अर्जुन गोंधळी यांनी बुद्धांनी दिलेल्या दुःखनिवारणाच्या मार्गाचे महत्त्व अधोरेखित केले. श्रीरंग गुरुजी यांनी राजवाड्यातील जीवनातून बुद्धत्वाकडे झालेल्या प्रवासाचे सविस्तर विवेचन केले. वैशाख कांबळे यांनी समाजाने संघटित होणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत गोंधळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन भीमराव गोंधळी यांनी मानले.

यावेळी रवि कांबळे, किरण कांबळे, संतोष पवार, शंकर कांबळे, सिद्धार्थ कांबळे, संदीप गोंधळी, विकास कांबळे, मनोहर कांबळे, सचिन कांबळे, शिवाजी कांबळे, विनायक कांबळे, गौतम कांबळे, अकाराम कांबळे, नितीन कांबळे, भिकाजी कांबळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.