Header Ads

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान उत्साहात संपन्न

 छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान उत्साहात संपन्न.

----------------------------

मुरगूड/ जोतीराम कुंभार.

----------------------------

 मुरगूड मंडळ, ता. कागल येथे शुक्रवार दिनांक 08 मार्च 2026 रोजी महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान आयोजित करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमास मुरगूड नगराध्यक्षा सौ.सुहासिनी देवी प्रवीण सिहं पाटील ,उपनगराध्यक्षा सौ रेखाताई दत्तात्रय मांगले ,सौ रुपाली दीपक अंगज व मुरगूड नगरपालिकेतील सर्व नगरसेवक तसेच श्री. अमरदीप वाकडे ,तहसिलदार कागल, श्री.अतिश वाळुंज मुख्याधिकारी मुरगूड नगरपालिका ,श्री. सौरभ तुपकर, उपअधीक्षक भूमिअभिलेख तसेच मंडळातील सर्व गावांचे सरपंच, सदस्य, शेतकरी लाभार्थी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक तसेच विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शिबिरामध्ये नागरिकांच्या विविध समस्या ऐकून त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात आली तसेच शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. महसूल विभागाकडील 504,पुरवठा विभाग 930,महा इ सेवा 264, महिला बचत गट 17, एकात्मिक बाल विकास प्रकल्प 63,महावितरण विभाग 03, , आरोग्य विभाग 2689, एकूण एकंदर 4460 इतक्या खातेदार यांना लाभ देणेत आला.

मा.तहसीलदार कागल यांनी शिबीराचे महत्व पटवून सांगितले व सर्व योजनांची माहिती दिली .नगरसेवक श्री शिवाजी चौगुले ,पंचायत समिती सदस्य सौ दीपाली अंगज यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

No comments:

Powered by Blogger.