“विट्यात पिस्टलचा काळाबाजार उघड! सांगली एलसीबीची धडाकेबाज कारवाई; ४ पिस्टलसह तरुण जेरबंद”
“विट्यात पिस्टलचा काळाबाजार उघड! सांगली एलसीबीची धडाकेबाज कारवाई; ४ पिस्टलसह तरुण जेरबंद”
२.६७ लाखांचा मुद्देमाल जप्त; शहरात खळबळ
----------------------------------सांगली प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यात अवैध शस्त्र विक्रीचे मोठे रॅकेट उघडकीस आणत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) धडाकेबाज कारवाई करत विटा येथील एका तरुणाला ताब्यात घेतले. आरोपीकडून तब्बल ४ देशी बनावटीची पिस्टल, ४ जिवंत काडतुसे आणि मोटारसायकल असा एकूण २ लाख ६७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे विटा शहरात एकच खळबळ उडाली आहे.
ही कारवाई २१ मे रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे केली. पोलिसांनी सापळा रचून धिरज सतीश चव्हाण (वय २१, रा. पारे रोड, बजरंगनगर, विटा, ता. खानापूर, जि. सांगली) याला ताब्यात घेतले.
तपासादरम्यान आरोपीकडून २ लाख ४० हजार रुपये किमतीची ४ देशी बनावटीची पिस्टल, २ हजार रुपये किमतीची ४ जिवंत काडतुसे, २५ हजार रुपये किमतीची बजाज सीटी १०० मोटारसायकल आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१२/२०२६ नोंद करण्यात आला असून आरोपीवर आर्म अॅक्ट कलम ३, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा ३७(१)(३)/१३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मा. पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना धारयकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार आणि एलसीबीच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.

No comments: