Header Ads

आकुर्डेतील वाघवाडीत बिबट्याचा हल्ला; घोडा ठार, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण.

 आकुर्डेतील वाघवाडीत बिबट्याचा हल्ला; घोडा ठार, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण.

-------------------------------------

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते .

---------------------------------------

शाहूवाडी तालुक्यातील आकुर्डे पैकी वाघवाडी येथे पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका घोड्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहन शामराव वाघ (वय ३८, व्यवसाय शेती) यांचा घोडा घराच्या परड्यामागे बांधलेला होता. त्याच ठिकाणी जवळपास नऊ गाई देखील होत्या. पहाटेच्या सुमारास बिबट्याने अचानक हल्ला चढवत घोड्याला ठार केले. सुदैवाने इतर जनावरे बचावली असली तरी या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.


घोड्याच्या मृत्यूमुळे शेतकरी मोहन वाघ यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून कुटुंबावर संकट कोसळले आहे. परिसरात वारंवार वन्यप्राण्यांचा वावर वाढत असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी जनावरे सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

ग्रामस्थांनी वनविभागाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करावा, नुकसान भरपाई द्यावी तसेच बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे.

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

No comments:

Powered by Blogger.