Header Ads

फेजिवडे माध्यमिक विद्यालयाची यशाची परंपरा कायम; दहावीचा निकाल १०० टक्के!

 फेजिवडे माध्यमिक विद्यालयाची यशाची परंपरा कायम; दहावीचा निकाल १०० टक्के!.


------------------------------------

राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे.

------------------------------------

राधानगरी तालुक्यातील  फेजिवडे येथील माध्यमिक विद्यालय या शाळेने यशाची परंपरा कायम ठेवत दहावीच्या परीक्षेत १०० टक्के निकालाची नोंद केली असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेल्या या यशामुळे माध्यमिक विद्यालयाचे परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.



माध्यमिक विद्यालय फेजीवडे या शाळेच्या ​गुणवंत विद्यार्थ्यांची चमक मार्च 26 मध्ये घेण्यात आलेल्या एसएससी

​या परीक्षेत मदिहा नावळेकर हिने ९२.२०% गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. तसेच झीनत नावळेकर (८६%) हिने द्वितीय, तर यश गुरव (७४.२०%) याने तृतीय क्रमांक मिळवला. याव्यतिरिक्त देवदास गुरव, अलसफी राऊत, ऋतुजा पाटील यांसह सर्व १६ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

​यशाचे मार्गदर्शक

​विद्यार्थ्यांच्या या यशात मुख्याध्यापक श्री. डी. एस. एरुडकर, वर्गशिक्षक श्री. पी. एस. पाटील, श्री. ए. एम. पाटील आणि सौ. आर. आर. निऊंगरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री. नंदकुमार पाटील व सचिव श्री. विलास पाटील यांचे प्रोत्साहन व पाठबळ विद्यार्थ्यांना मिळाले.

​"विद्यार्थ्यांची मेहनत आणि शिक्षकांचे योग्य नियोजन यामुळेच आम्ही १०० टक्के निकालाचे ध्येय गाठू शकलो," अशी भावना सरपंच प्रतिभा कासार यांनी  व्यक्त केली.

​सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांकडून व शालेय व्यवस्थापन समितीकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

फोटो 

मंदिहा नावळेकर 

जिनत  नावळेकर

No comments:

Powered by Blogger.