गाव नमुना ' ड ' साठी उपविभागीय अधिकारी कार्यालय पुसद यांना निवेदन.
गाव नमुना ' ड ' साठी उपविभागीय अधिकारी कार्यालय पुसद यांना निवेदन.
-------------------------------आज दिनांक ४जून रोजी उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांना संभाजी नगर (इंदिरा वसाहत ) येथील रहवाशी यांनी निवेदन देवून गाव नमूना 'ड' देण्याची मागणी केली
सविस्तर असे की संभाजी नगर (इंदिरा वसाहत ) पुसद येथील रहिवासी हे 1998,1990 पासून रहवाशी असून येथील जागा ही नगर परिषद पुसद यांनी राहण्यासाठी स्थलांतरित केलेली आहे त्यानुसार त्यांना अंदाजे 35 वर्षांपासून नगर परिषद पुसद ने नमूना ड दिलेला नाही येथील रहवाशी हे रोजमजुरी करून कुटूंबाचा उदनिर्वाह करतात शासन निर्णय GR 2026 नुसार 'सर्वासाठी घरे ' सुधारित कायद्यार्तंगत रहवाशी लाभार्थी आहेत तरी सुद्धा नगरपरिषद पुसद हे नमूना "ड देण्यास टाळाटाळ करत आहे व उडवा उडवीचे उत्तरे देत आहे तसेच इतर शासकीय योजना पासून वंचित ठेवत असल्याचे येथील रहवाशींनी निवदेनात म्हटले आहे त्यांच्याकडे वार्षिक टॅक्स पावती आहे संबधित नगर परिषद पुसद यांनी कागदपत्राची पूर्तता करून न्याय देण्यात यावा असे निवेदन उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांना देण्यात आले आहे

No comments: