उजळाईवाडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी
उजळाईवाडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी.
----------------------------उजळाईवाडी (ता.करवीर) येथे लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
डॉ. संदीप हजारे यांनी प्रास्ताविक करून अहिल्यादेवी होळकर यांच्या सामाजिक, धार्मिक व लोकहितकारी कार्याची माहिती दिली.
लोकनियुक्त सरपंच उत्तम आंबवडे, उपसरपंच सारिका माने, करवीर पंचायत समिती सदस्या डॉ. शिल्पा हजारे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष नायकु बागणे, माजी सरपंच संपत दळवी, बाळासाहेब जाधव, एकनाथ माने, ग्रा.प सदस्य प्रतिभा पोवार,मराठा महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्षा शैलजा भोसले ,बुलगानिन कांबळे, संदीप माने, अशोक लांडगे, प्रकाश मेटकरी, बाबुराव हजारे, आनंदा जंगम, ॲड. शशिकांत जंगम, योगेश माने, संजय धनगर, सुरेश धनगर, ओंकार धनगर, स्वरूप धनगर, विवेक पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी समस्त धनगर बांधव, महिला, युवक-युवती यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन सातपुते यांनी केले. आभार राजेंद्र धनगर यांनी मानले.

No comments: