Header Ads

जुन्नरमध्ये रक्ताच्या नात्याला काळिमा; मुलाने वडील व भावाची केली हत्या.

 जुन्नरमध्ये रक्ताच्या नात्याला काळिमा; मुलाने वडील व भावाची केली हत्या.

-------------------
कैलास बोडके.
------------------

जुन्नर, पुणे: जुन्नर तालुक्यात रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून मुलाने आपल्या वडील व लहान भावाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ओतूर पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी 

दिलेल्या माहितीनुसार पारगाव मढ तर्फे हद्दीत बगाडवाडी येथे राहणाऱ्या जयराम महादू मुकणे वय ६० आणि राजेंद्र जयराम मुकणे वय २७ यांची त्यांच्याच मुलगा व भाऊ बाबाजी जयराम मुकणे वय ३३ याने दगडाने ठेचून हत्या केली.असा प्राथमिक अंदाज आहे. घटनेनंतर आरोपी फरार होण्याचा प्रयत्न करत होता, मात्र ओतूर पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली.

प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून जमीन, पैसा, कौटुंबिक कलह  यावरून वडील व मुलामध्ये वारंवार भांडणे होत होती, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.

ओतूर पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

या घटने संपूर्ण जुन्नर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे

No comments:

Powered by Blogger.