Header Ads

डुंबरवाडीत गुरुपौर्णिमा महोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न; हजारो भक्तांचा सहभाग.

 डुंबरवाडीत गुरुपौर्णिमा महोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न; हजारो भक्तांचा सहभाग.

आळेफाटा (प्रतिनिधी )

डुंबरवाडी, ता. [ता. जुन्नर ] - येथील पवित्र श्री स्वामी समर्थ भक्ती शक्ती मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित महोत्सव अत्यंत भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि दिव्य वातावरणात संपन्न झाला. 

मंदिर परिसरात दिवसभर स्वामी नामाचा गजर घुमत होता. पहाटेपासूनच हजारो स्वामीभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. गर्दीचे नियोजन, दर्शन व्यवस्था, महाप्रसाद, स्वच्छता आणि धार्मिक विधी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.

या महोत्सवाच्या यशाचे श्रेय मंदिर समितीने सर्व सेवेकऱ्यांना दिले. कोणी स्वच्छता, कोणी पूजा तयारी, कोणी महाप्रसाद, तर कोणी वाहन व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली. माता-भगिनी, युवक, ज्येष्ठ आणि दात्यांच्या निस्वार्थ योगदानामुळे हा सोहळा यशस्वी झाला.

भक्ती शक्ती मंदिर समितीच्या वतीने सर्व सेवेकऱ्यांचे, दात्यांचे आणि भक्तांचे आभार मानण्यात आले. "जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत स्वामींची सेवा सुरू राहील" असा संकल्प यावेळी करण्यात आला.

स्वामींच्या कृपेने मंदिराचे कार्य दिवसेंदिवस अधिक व्यापक होत असल्याचे ह. भ. प. चंद्रकांत डुंबरे यांनी सांगितले.

No comments:

Powered by Blogger.