Header Ads

दुसऱ्याचा जीव वाचवताना रुग्णवाहिका चालकाचा मृत्यू; गायमुखवाडी गावामध्ये भीषण अपघात.

 दुसऱ्याचा जीव वाचवताना रुग्णवाहिका चालकाचा मृत्यू; गायमुखवाडी गावामध्ये भीषण अपघात.

खामुंडी, ता. जुन्नर:दुसऱ्या अपघातातील जखमीला उपचारासाठी घेऊन जात असताना रुग्णवाहिकेचा पीकप वाहनाशी झालेल्या भीषण अपघातात रुग्णवाहिका चालकाचा पुढील उपचारासाठी आळेफाटा येथे नेत असताना मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना अहिल्या नगर - कल्याण महामार्गावरील गायमुखवाडी, ता. जुन्नर येथे दि. १७ जुलै रोजी रात्री १२:३० च्या दरम्यान घडली 

मिळालेल्या माहितीनुसार,दि. १७ जुलै रोजी रात्री १२ च्या दरम्यान खामुंडी गावाजवळ टेंपो आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत काही जण जखमी झाले होते. त्यातील एका अपघातग्रस्ताला उपचारासाठी आळेफाटा येथील रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका रवाना झाली होती. 

गायमुखवाडी गावाजवळ पोहोचताच समोरून येणारे पीकप वाहन व रुग्णवाहिका यांच्या जोरदार धडकेत  रुग्णवाहिकेचा मोठ्या प्रमाणात चक्काचूर झाला. 

या अपघातात रुग्णवाहिका चालक कुणाल तुकाराम डुंबरे, रा. डुंबरवाडी यांचा जागीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि ओतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कुणाल डुंबरे हे दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी जात असताना स्वतःच अपघाताला बळी पडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ओतूर पोलिसांनी घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.

No comments:

Powered by Blogger.