Header Ads

भरधाव पिकअप चालवून पादचाऱ्यांच्या जीवाला धोका; डिंगोरेच्या तरुणावर ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

भरधाव पिकअप चालवून पादचाऱ्यांच्या जीवाला धोका; डिंगोरेच्या तरुणावर ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

ओतूर : ओतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना भरधाव वेगाने व वेडीवाकडी पिकअप चालवून पादचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या चालकावर ओतूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

पोलीस अंमलदार शामसुंदर जायभाये व पोलीस हवालदार नामदेव बांबळे हे नेहमीच्या पेट्रोलिंगवर असताना  डिंगोरे(ता. जुन्नर )येथील आमले शिवार वस्तीकडे जाणाऱ्या पुष्पावती नदीच्या पुलावर ही घटना घडली.

या ठिकाणी MH14LB7435 क्रमांकाच्या पिकअपचा चालक सौरभ संतोष भिसे, रा. डिंगोरे, ता. जुन्नर, जि. पुणे हा रस्त्यावरील परिस्थितीकडे पूर्णतः दुर्लक्ष करून भरधाव वेगाने वाहन चालवत होता. रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने त्याने वेडीवाकडी गाडी चालवली.

ही बाब लक्षात येताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत भिसे याच्याविरुद्ध ओतूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. 

पुढील तपास व योग्य ती कायदेशीर कार्यवाही ओतूर पोलीस करत आहेत, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी दिली असून पीक अप चालकांनी कोणतीही स्टंट बाजी न करता कायद्याचे पालन करून वाहन चालवावे कायद्याच्या विरोधात आढळून आल्यास कायदेशीर कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असेल आवाहन बाजगीरे यांनी वाहन चालकांना केले आहे.

No comments:

Powered by Blogger.