Header Ads

विद्यामंदिर पाल येथे भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळा उत्साहात संपन्न.

 विद्यामंदिर पाल येथे भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळा उत्साहात संपन्न.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
शाहुवाडी | प्रतिनिधी : आनंदा तेलवणकर.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आषाढी एकादशीचे औचित्य साधत विद्यामंदिर पाल येथे बाल वारकऱ्यांचा पारंपरिक दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांना संत परंपरा, वारकरी संप्रदायाचे संस्कार आणि भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून हातात भगवे ध्वज घेत ज्ञानोबा-तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल अशा नामगजरात दिंडी काढली. संतांच्या वेशातील विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली, तर मुलींच्या पारंपरिक वेशभूषेमुळे कार्यक्रमाची शोभा अधिक खुलून दिसली. संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजराने आणि भक्तिरसाने भारावून गेला.

या कार्यक्रमास मुख्याध्यापक श्री. बाळासाहेब पाटील, सहाय्यक शिक्षक श्री. रमेश विचारे, तसेच सर्व शिक्षक, ग्रामस्थ, वारकरी, पालकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे मनापासून कौतुक केले.

याप्रसंगी मुख्याध्यापक श्री. बाळासाहेब पाटील यांनी विद्यार्थ्यांना संतांच्या विचारांचे महत्त्व सांगत समाजात प्रेम, बंधुता आणि सेवाभाव जोपासण्याचे आवाहन केले.

No comments:

Powered by Blogger.