Header Ads

शेटकेवाडीत जमीन वादाचा स्फोट! दोन गटांमध्ये तुफान राडा; परस्पर गुन्हे दाखल, पाच जण अटकेत

 शेटकेवाडीत जमीन वादाचा स्फोट! दोन गटांमध्ये तुफान राडा; परस्पर गुन्हे दाखल, पाच जण अटकेत.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
राधानगरी - विजय बकरे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

राधानगरी :-

राधानगरी तालुक्यातील शेटकेवाडी येथे जमीन गट क्रमांक ५३२ मधील मालकी व शेतीच्या वादातून दोन गट आमनेसामने येत तुफान हाणामारी झाली. या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून, पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परिसरात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

पहिल्या फिर्यादीत नियती रणजीत भोसले यांनी म्हटले आहे की, त्या आपल्या कुटुंबीयांसह शेतात रोपलागवड करत असताना विरोधी गटाने "हे शेत आमचे आहे, येथे काम करू नका," असे म्हणत वाद घातला. त्यानंतर काठ्या, लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

या मारहाणीत नियती रणजीत भोसले, रणजीत भोसले, मनोज नांदवडेकर, दिनकर भोगुलकर, चंदा भोगुलकर, अस्मिता मगदूम, सुलभा नांदवडेकर आणि सोहम नांदवडेकर जखमी झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या गुन्ह्यात भरत शंकर भोगुलकर, मनोहर शंकर भोगुलकर, सिद्धार्थ मनोहर भोगुलकर, आकाश खांडेकर आणि निखिल रेडेकर यांना राधानगरी पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, दुसऱ्या बाजूने भरत शंकर भोगुलकर यांनीही फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, गट क्रमांक ५३२ मधील गवत कापले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी गेले असता दुसऱ्या गटाने त्यांच्यावर हल्ला केला. या मारहाणीत भरत शंकर भोगुलकर, मनोहर शंकर भोगुलकर आणि सिद्धार्थ मनोहर भोगुलकर जखमी झाले. पत्नी व भावजय यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या परस्परविरोधी गुन्ह्यात दुसऱ्या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, राधानगरी पोलीस दोन्ही बाजूंच्या तक्रारींचा सखोल तपास करत आहेत.

No comments:

Powered by Blogger.