Header Ads

गुरु पौर्णिमेनिमित्त भक्तांसाठी आनंदाची बातमी! संभाजीनगर एसटी आगारातून अक्कलकोटसाठी जादा बसेस; स्वामी समर्थ दर्शनासाठी विशेष व्यवस्था

 गुरु पौर्णिमेनिमित्त भक्तांसाठी आनंदाची बातमी!संभाजीनगर एसटी आगारातून अक्कलकोटसाठी जादा बसेस; स्वामी समर्थ दर्शनासाठी विशेष व्यवस्था

कोल्हापूर :- गुरु पौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोट येथील दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन संभाजीनगर एसटी आगाराने विशेष तयारी केली आहे. भाविकांच्या सोयीसाठी दि. २८ व २९ जुलै २०२६ रोजी अक्कलकोट मार्गावर जादा एसटी बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक दयानंद पाटील यांनी दिली.

या दोन दिवसांत सकाळपासून भाविकांच्या मागणीनुसार अतिरिक्त बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून, सुरक्षित, आरामदायी आणि वेळेवर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गुरु पौर्णिमेनिमित्त मोठ्या संख्येने भाविक अक्कलकोटकडे रवाना होतात. ही वाढलेली गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने केलेल्या या विशेष व्यवस्थेचा लाभ घ्यावा, तसेच सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी खासगी वाहनांऐवजी एसटी सेवेचा वापर करावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक दयानंद पाटील यांनी केले आहे.

No comments:

Powered by Blogger.