Header Ads

बाळूमामांच्या बग्यात आषाढीचा भक्तिमय उत्सव; बग्गा क्रमांक १३ वर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

 बाळूमामांच्या बग्यात आषाढीचा भक्तिमय उत्सव; बग्गा क्रमांक १३ वर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी.

महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, कोकण व आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत सद्गुरू श्री बाळूमामांच्या १९ बग्यांमध्ये आषाढी एकादशी मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली.

भजन, कीर्तन, हरिजागर, प्रवचन, रिंगण सोहळा व पारंपरिक धार्मिक कार्यक्रमांनी बगे भक्तिरसात न्हाऊन निघाले. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बोरीभडक येथील बग्गा क्रमांक १३ वर हेलिकॉप्टरमधून झालेल्या भव्य पुष्पवृष्टीने सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले. हा अविस्मरणीय क्षण अनुभवण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली.

आरती व द्वादशीच्या महाप्रसादानंतर भाविकांनी संत बाळूमामांचे दर्शन घेऊन आपल्या गावी प्रस्थान केले

No comments:

Powered by Blogger.