कासारी खोऱ्यात मुसळधार पाऊस; बर्की बंधारा पाण्याखाली, प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन.
कासारी खोऱ्यात मुसळधार पाऊस; बर्की बंधारा पाण्याखाली, प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन.
~~~~~~~~~~~~~~~~~~~शाहुवाडी :- गेली 24 तासापासून कासारी खोऱ्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने बर्की बंधारा पुन्हा एकदा पाण्याखाली गेला असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी बंधार्यावर तैनात करण्यात आले आहेत...
शाहूवाडी तालुक्यातील कासारी खोऱ्यात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कासारी नदीला मोठा पूर आला असून बर्की बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली असून परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सततच्या पावसामुळे नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी विनाकारण नदीपात्र किंवा बंधाऱ्यावर जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी महसूल व पोलीस प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
दरम्यान, कासारी खोऱ्यात पावसाचा जोर कायम असून आणखी पाऊस झाल्यास नदीची पातळी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित ठिकाणी राहावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे...

No comments: