Header Ads

प्रवाशांच्या तक्रारींना प्राधान्य; प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार' – विभागीय नियंत्रक वृशाली भोसले.



प्रवाशांच्या तक्रारींना प्राधान्य; प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार' – विभागीय नियंत्रक वृशाली भोसले.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
 राधानगरी प्रतिनिधी : विजय बकरे

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

"एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. प्रवाशांच्या तक्रारी व अडचणी तातडीने दूर करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील," असे आश्वासन कोल्हापूर एसटी महामंडळाच्या विभागीय नियंत्रक सौ. वृशाली भोसले यांनी दिले.

राधानगरी एसटी आगारात आयोजित 'प्रवासी राजा दिन' व 'कामगार दिन' कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विभागीय नियंत्रक पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रथमच राधानगरी एसटी आगाराला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रवाशांच्या तक्रारी गांभीर्याने घेऊन त्या दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे स्पष्ट केले.

याशिवाय, राधानगरी एसटी आगारातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित अडचणी तातडीने सोडविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करून प्रवाशांना अधिक चांगली सेवा द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

प्रथमच राधानगरी आगाराला भेट दिल्याबद्दल आगार प्रशासनाच्या वतीने आगारप्रमुख प्रमोद तेलवेकर यांच्या हस्ते सौ. वृशाली भोसले यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.

यावेळी स्थानक प्रमुख राहुल घाडगे, लेखा अधिकारी मानिनी तेलवेकर, कामगार अधिकारी संदीप भोसले, विभागीय वाहतूक अधीक्षक सागर पाटील, सांख्यिकी अधिकारी अनिल पार्टी तसेच एसटीचे अधिकारी, कर्मचारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित

No comments:

Powered by Blogger.