Header Ads

कौलव हायस्कूल आणी शिवराज इंग्लिश स्कुल कौलव मध्ये वारकरी दिंडी, व पालखी सोहळ्याचे आयोजन

 कौलव हायस्कूल आणी शिवराज इंग्लिश स्कुल कौलव मध्ये वारकरी दिंडी, व पालखी सोहळ्याचे आयोजन.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संदीप कलिकते/कौलव प्रतिनिधी.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आषाढी एकादशीचे औचित्य साधुन कौलव हायस्कूल आणि शिवराज इंग्लिश स्कुल कौलव यांच्या वतीने संस्कृती व संस्काराची जोपासना करत वारकरी दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते 

.   विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास होण्यासाठी या शाळेतर्फे दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात शाळेतील शिक्षक वृंद विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सर्व गुणसंपन्न बनविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात वारकरी दिंडी व पालखी सोहळ्याचे उद्घाटन मुख्याध्यापक आर जी भोसले यांच्या हस्ते करण्यात आले दिंडी सोहळ्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी पोशाख परिधान केला होता यावेळी मुलांनी धोतर कुर्ता, गांधी टोपी आणि कपाळावर बुक्का लावून विठ्ठलरुपी पोशाख आणि मुलींनी न ऊ वारी साडी नेसुन डोक्यावर तुळशी वृंदावन व कलश घेऊन उत्साहाने सहभागी झाल्या होत्या "ज्ञानोबा माऊली, तुकाराम " आणि "पुंडलिक वरदे, हरी विठ्ठल " या जयघोषाने विद्यार्थ्यांनी संपुर्ण गाव दणाणून सोडले गावातील मुख्य रस्ते आणि चौकाचौकातुन ही दिंडी काढण्यात आली ठिकठिकाणी ग्रामस्थांनी आणि महिलांनी पालखीचे दर्शन घेतले दिंडी दरम्यान विद्यार्थ्यांनी रिंगण सोहळा देखील साजरा केला विठ्ठल नामाचा गजर करत झिम्मा फुगड्या सारखे पारंपरिक खेळ खेळले या बालवारकर्याचा उत्साह पाहून ग्रामस्थ भारावून गेले होते या सोहळ्यात बालगोपालांनी श्री संत तुकाराम महाराज, श्री संत ज्ञानेश्वर महाराज, स़ंत मुक्ताई अशा वेगवेगळ्या संताच्या वेशभूषा केल्याने शाळेत पंढरी अवतरल्याचे दिसत होते या वारकरी दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक आर जी भोसले सर कौलव हायस्कूल आणि शिवराज इंग्लिश स्कूलचे शिक्षक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले

No comments:

Powered by Blogger.