खामुंडीच्या जिल्हा परिषद शाळेत पोलिसांकडून 'गुड टच-बॅड टच' जनजागृती.
खामुंडीच्या जिल्हा परिषद शाळेत पोलिसांकडून 'गुड टच-बॅड टच' जनजागृती.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~मुलांची सुरक्षा आणि आत्मसंरक्षणाबत जनजागृती करण्यासाठी ओतूर पोलीस ठाण्याच्या वतीने येथील जिल्हा परिषद शाळा खामुंडी येथे मार्गदर्शन सत्र घेण्यात आले.
या सत्रात पोलीस कर्मचारी मयुरी खोसे, संगीता मधे, अंजुम इनामदार यांनी विद्यार्थ्यांना 'गुड टच' आणि 'बॅड टच' मधील फरक सोप्या भाषेत आणि उदाहरणांसह समजावून सांगितला. कोणता स्पर्श सुरक्षित आहे आणि कोणत्या स्पर्शाने अस्वस्थ वाटत असेल तर काय करावे, याचे प्रशिक्षण देण्यात आले.- पालक-शिक्षकांचा प्रेमाचा स्पर्श, अभिनंदनाची थाप हा 'गुड टच'भीती, लाज किंवा अस्वस्थता निर्माण करणारा स्पर्श म्हणजे 'बॅड टच असा प्रसंग घडल्यास त्वरित डायल ११२ ला सपंर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
यावेळी बोलताना ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांनी सांगितले, "आपल्या शरीरावर फक्त आपलाच अधिकार आहे. काही चुकीचे घडले तर घाबरू न जाता मोठ्यांना सांगणे हेच खरे धैर्य आहे."
या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सविता हिरे शिक्षक सुखदेव पथवे, दिपाली डुंबरे, शोभा खर्गे, काशिनाथ इले आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना हेल्पलाइन क्रमांक असलेली माहितीपत्रके वाटण्यात आली.
ओतूर परिसरातील इतर जिल्हा परिषद शाळांमध्येही असे जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती बाजगीरे यांनी दिली.

No comments: