Header Ads

पाऊस मंदावला ; ऊस झाला भुईसपाट,करवीर तालुक्याला मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याचा फटका.

 पाऊस मंदावला ; ऊस झाला भुईसपाट,करवीर तालुक्याला मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याचा फटका.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कुडित्रे प्रतिनिधी.प्रा पी जे पाटील.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

 गेल्या आठवडाभरापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने विश्रांती घेतली. गुरुवारी सूर्यराजाचे दर्शन झाले. परिणामी कुंभी नदीच्या पुराच्या पाण्याला ओहोटी लागली. पाणी पातळीत घट झाली. नदीकाठावरील ऊस पीक पुराच्या पाण्याच्या विळख्यापासून बचावला असला तरी मुसळधार

 पावसासह आलेल्या वादळी वाऱ्याने करवीर तालुक्यातील अनेक गावांतील ऊसाच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. हजारो एकरातील ऊस अक्षरशः भुईसपाट झाला असून शेतकऱ्यांवर दुहेरी आर्थिक संकट ओढवले आहे.

       चालूवर्षी पावसाच्या उशिरामुळे आधीच शेतीची कामे विस्कळीत झाली होती. त्यातच मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्याने संपूर्ण चित्रच बदलून टकले. अनेक शेतामध्ये उसाचे पीक पूर्णपणे भुईसपाट झाल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त होत आहे . भुईसपाट झालेला ऊस उभा करणे अशक्य असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पावसाळ्यातील आठवड्याभरात उसाची ही अवस्था तर पुढे उसाचे काय होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. पाण्याचा निचरा न झाल्यास उसाचे कुजणे , रोगराई वाढणे आणि साखरेचा उतारा कमी होण्याचाही धोका निर्माण झाला आहे. सततच्या बदलत्या हवामानामुळे शेतीचे नियोजन कोलमडत आहे. नैसर्गिक आपतींचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांनाच बसत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.

No comments:

Powered by Blogger.