तांबे येथे शिक्षक कै. भास्करराव पानसरे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शैक्षणिक साहित्याचे वाटप..
तांबे येथे शिक्षक कै. भास्करराव पानसरे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शैक्षणिक साहित्याचे वाटप..
~~~~~~~~~~~~~~~~~~तांबे(ता. जुन्नर )येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे दिवंगत शिक्षक कै. भास्कराव पानसरे यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
गेल्या चार वर्षांपासून माजी विद्यार्थी पानसरे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी हा उपक्रम राबवत आहेत. यंदाचे हे चौथे वर्ष होते.
या कार्यक्रमाला अभियंता नामदेव तोते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या शैक्षणिक साहित्याचे वाटप तांबे गावच्या सरपंच मीराबाई मडके, वकील ललित दादाभाऊ जोशी, चेअरमन यशवंत मडके, यशवंत पानसरे , वनपरिक्षेत्र अधिकारी शशिकांत मडके, मुख्याध्यापक हेमंत कुमार नांगरे, सुनील लोकरे व किरण वाळुंज,किरण लोकरे, पांडुरंग भांगे, गोविंद मडके गुरुजी, शिवाजी मडके, किसन मडके, सुनील मिंढे, निलेश मडके, एकनाथ पानसरे, विश्वास ढोले,उल्हास मिंढे, राजाराम मिंढे, उल्हास वाळुंज, मंगेश मिंढे, गणपत मडके, सुशील मडके व भगवान वाळुंज यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी माजी विद्यार्थी, पानसरे कुटुंबीय, विद्यालयाचे कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवर व ग्रामस्थांनी पानसरे यांच्या कार्याला व आठवणींना उजाळा दिला.
पुढील वर्षासाठीही शिष्यवृत्ती निधी विद्यालयाकडे जमा करण्यात आला आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण मातेरे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक हेमंत कुमार नांगरे यांनी मानले.

No comments: