Header Ads

राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला; सात पैकी चार स्वयंचलित दरवाजे खुले, भोगावती नदीकाठच्या नागरिकांना सावधतेचा इशारा

 राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला; सात पैकी चार स्वयंचलित दरवाजे खुले, भोगावती नदीकाठच्या नागरिकांना सावधतेचा इशारा

राधानगरी

धरण परिसरात व पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे राधानगरी धरण शंभर टक्के भरले असल्याने आज सोमवारी (३ ऑगस्ट) दुपारी ३:२५ वाजेपर्यंत धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले असून तर यापूर्वीचे दोन स्वयंचलित असे चार स्वयंचलित दरवाजांतून ५,७१२ क्यूसेक आणि बीओटीमधून १,४०० क्यूसेक, असा एकूण ७,११२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे.

सध्या धरण १०० टक्के भरले असून, पाणीपातळी ३४७.५४ फूट आणि पाणीसाठा ८,३५९.९० दशलक्ष घनफूट इतका झाला आहे. गेल्या १४ तासांत ११० मिमी पावसाची नोंद झाली असून, १ जून ते ३ ऑगस्ट या कालावधीत धरण परिसरात ३,१६६ मिमी पाऊस झाला आहे.


यापूर्वी गुरुवारी रात्री ११:३२ वाजता सहा क्रमांकाचा आणि शुक्रवारी दुपारी ४:०३ वाजता तीन क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडण्यात आला होता. त्यानंतर पावसाचा जोर कायम राहिल्याने सोमवारी आणखी दोन स्वयंचलित दरवाजे खुले करण्यात आले.

धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने भोगावती नदीकाठच्या शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जलसंपदा विभाग, राधानगरी यांनी केले आहे.

No comments:

Powered by Blogger.