बामणोलीतील रस्त्याचे काम सहा महिन्यांपासून रखडले; नागरिकांचा संताप, प्रशासनाचे लक्ष कधी जाणार?
बामणोलीतील रस्त्याचे काम सहा महिन्यांपासून रखडले; नागरिकांचा संताप, प्रशासनाचे लक्ष कधी जाणार?
कुपवाड-मिरज :-
बामणोली येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज प्रवेशद्वार ते राधा एसटीडीपर्यंतच्या रस्त्याचे काम गेल्या सहा महिन्यांपासून रखडले असून, नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना खोदकाम, माती, दगड आणि खड्ड्यांमुळे शाळकरी विद्यार्थी, महिला, वृद्ध नागरिक व दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या मार्गावर शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह शाळेच्या बसेस व मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता असून, दर्जेदार काम वेळेत पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सहा महिन्यांपासून काम का रखडले? कामाची गती एवढी संथ का? नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची? रस्ता पूर्ण होण्याची निश्चित मुदत प्रशासन जाहीर करणार का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

No comments: