किरवे येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर उत्साहात संपन्न; १०२ रुग्णांची तपासणी, २९ रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया होणार.
किरवे येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर उत्साहात संपन्न; १०२ रुग्णांची तपासणी, २९ रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया होणार.
----------------------कळे प्रतिनिधी
साईश मोळे
९५९५३१६२६६.
-----------------------
श्री सत्यसाई सेवा संघटना, कोल्हापूर आयोजित व समता नगर, किरवे यांच्या सहकार्याने श्री स्वयंभू मंदिर, किरवे येथे आयोजित करण्यात आलेले मोफत नेत्ररुग्ण तपासणी, उपचार व मोफत ऑपरेशन शिबीर दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाले.
या शिबिरास परिसरातील नेत्ररुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात एकूण *१०२ रुग्णांची मोफत नेत्र तपासणी* करण्यात आली. तपासणीअंती त्यापैकी *२९ रुग्णांना मोतीबिंदू व इतर नेत्र शस्त्रक्रियेची आवश्यकता* असल्याचे निदान झाले असून, या सर्व २९ रुग्णांना पुढील उपचारासाठी *नंदादीप नेत्रालय, कोल्हापूर येथे पाठविण्यात येणार आहे.* तेथे त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करून त्याच दिवशी डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
गगनबावडा तालुक्यातील दुर्गम भागातील गोरगरीब व गरजू रुग्णांना डोळ्यांच्या उपचारासाठी कोल्हापूरला जाणे शक्य नसल्याने हे शिबीर त्यांच्यासाठी वरदान ठरले आहे.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी *दिलीप पाटील (भाऊ), किरवे* यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच साई राम प्रसाद धारवाडकर भैय्या, बिपीन बोरकर, ऋषिकेश येरुडकर, संजय कांबळे, अरुण कांबळे, सुनील मोळे व सत्यसाई सेवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
या शिबिरामुळे किरवे, समता नगर व गगनबावडा परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून सत्यसाई सेवा संघटनेच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments: