स्वराज्य स्केटिंग अकॅडमीच्या खेळाडूंचा सलग ५ तास स्केटिंगचा विश्वविक्रम.
स्वराज्य स्केटिंग अकॅडमीच्या खेळाडूंचा सलग ५ तास स्केटिंगचा विश्वविक्रम.
कोल्हापूर प्रतिनिधी रहिम पिंजारी.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
उंचगाव : -स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सांगली येथील एमआयटी स्कूलच्या स्केटिंग ग्राउंडवर १०० स्केटिंगपटूंनी सलग पाच तास स्केटिंग करत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. या विक्रमात ३ ते १७ वर्षे वयोगटातील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या विश्वविक्रमाचे उद्घाटन सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या क्रीडा अधिकारी स्नेहांकित वरुते आणि एमआयटी स्कूलचे प्राचार्य चेतन सोनवणे यांच्या हस्ते झाले. बक्षीस वितरण समारंभ डॉ. महेश होनमोरे व रितेश बारिताया यांच्या हस्ते करण्यात आला.
या विक्रमाची नोंद रॉयल युरो बुक ऑफ रेकॉर्ड, द अमेरिकन बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड युनियन आणि सुपर स्पोर्ट्स रेकॉर्ड या चार रेकॉर्ड बुकमध्ये झाल्याचे आयोजकांनी सांगितले.
या विक्रमासाठी आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक सूरज शिंदे, सौ. परवीन शिंदे, आयेशा मुलानी, विनायक पाटील, आशुतोष फुटाणे आणि शुभांगी कांबळे यांनी नियोजन केले.
स्वराज्य रोलर स्केटिंग अकॅडमी, उचगावच्या रणविजय भोसले, अभिमन्यू पाटील, आराध्या परब, सिद्धार्थ काळे, हर्ष जाधव, अथर्व जाधव आणि स्वरा दोडमनी या खेळाडूंनी सलग पाच तास स्केटिंग करून या विक्रमात सहभाग नोंदविला.
विक्रम यशस्वी करण्यासाठी पंकजसिंह देशमुख, अहद मुलानी आणि गौराज कांबळे यांनी परिश्रम घेतले. यानंतर उंचगाव येथे खेळाडूंचा कौतुक सोहळा आयोजित करून त्यांचा गुलाबपुष्प व फेटे बांधून सत्कार करण्यात आला.
पंचायत समिती सदस्य सौ. संगीता बाळासाहेब यादव, छत्रपती विकास संस्थेचे चेअरमन बाळासाहेब यादव, ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील, सौ. वैजयंती यादव, मधुकर चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते शामराव यादव तसेच उंचगाव ग्रामपंचायतचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सौ. शुभांगी कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले असून, अध्यक्ष विजय जाधव, पालक व अकॅडमीच्या सदस्यांचे सहकार्य मिळत आहे

No comments: