Header Ads

मागासवर्गीयांच्या जमिनीवरील अतिक्रमणाची चौकशी करा; अन्यथा १५ ऑगस्टला तीव्र आंदोलनाचा इशारा

 मागासवर्गीयांच्या जमिनीवरील अतिक्रमणाची चौकशी करा; अन्यथा १५ ऑगस्टला तीव्र आंदोलनाचा इशारा...

सांगली : मागासवर्गीय नागरिकांच्या जमिनीवर अतिक्रमण करून त्या बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची तसेच संबंधित प्रशासकीय यंत्रणेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी जय भीम क्रांती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल न घेतल्यास १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.




याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मल्लाप्पा तम्माण्णा धाबडे (रा. दुधोंडी, ता. पलूस) हे अनुसूचित जाती प्रवर्गातील भूमिहीन नागरिक आहेत. शासनाकडून त्यांना १.५२ आर क्षेत्रातील प्लॉट क्रमांक ३९ प्रदान करण्यात आला असून, या जमिनीबाबत फेरफार क्रमांक ५२३८ मंजूर असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


धाबडे हे आपल्या जागेवर घर बांधण्यासाठी गेले असता काही व्यक्तींनी तेथे अतिक्रमण करून जागेवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी ग्रामपंचायत, ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी करूनही अपेक्षित दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.


मागासवर्गीय नागरिकांना शासनाकडून मिळालेल्या जमिनींचे संरक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे संबंधित जमीन प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून अतिक्रमणाचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच या प्रकरणात कोणत्याही प्रकारचे प्रशासकीय संगनमत असल्यास त्याचीही चौकशी करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.


दरम्यान, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात

No comments:

Powered by Blogger.