Header Ads

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, चटई व खाऊ वाटप

 अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, चटई व खाऊ वाटप

समाजसेवक बबलू तिवडे यांच्या पुढाकारातून जयसिंगपूर आश्रमशाळेत सामाजिक उपक्रम; वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश.

जयसिंगपूर | प्रतिनिधी

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त समाजसेवक बबलू (भाऊ) तिवडे यांच्या वतीने जयसिंगपूर येथील प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, चटई व खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात जयसिंगपूर नगरपरिषदेचे आरोग्य सभापती पराग (दादा) पाटील यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी बोलताना पराग पाटील यांनी समाजसेवक बबलू तिवडे यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन राबविण्यात आलेले उपक्रम प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

महाराष्ट्र शासनाचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त बाळासाहेब गायकवाड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तर युवा नेते संतोष भोसले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

यावेळी हरिश्चंद्र सुर्वे, लखन तिवडे, श्रीनिवास आवळे, गौतम धनवडे, करण तिवडे, रवी तिवडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व महिला वर्ग उपस्थित होते. राजश्री तिवडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या आयोजनातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसोबतच पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे आभार महेश खताळ यांनी मानले.

No comments:

Powered by Blogger.