तिर्थक्षेत्र बहिरम ते सालबर्डी पायदळ वारीचा भक्तिमय सोहळा; १६ ऑगस्टला सांगता.
तिर्थक्षेत्र बहिरम ते सालबर्डी पायदळ वारीचा भक्तिमय सोहळा; १६ ऑगस्टला सांगता.
अमरावती : श्री बहिरम सेवा समितीच्या वतीने स्व. विनोद पाटील घुलक्षे तसेच वैकुंठवासी झालेल्या भाविक भक्तांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तिर्थक्षेत्र बहिरम ते तिर्थक्षेत्र सालबर्डी पायदळ वारी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. १३ ऑगस्टपासून सुरू झालेली ही वारी १६ ऑगस्ट रोजी भक्तिमय वातावरणात सांगता होणार आहे.वारीदरम्यान विविध ठिकाणी भजन, हरिकिर्तन, महाप्रसाद, चहा-फराळ आणि देवदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. बहिरम येथून प्रस्थान केल्यानंतर शिरजगाव कसबा, अंबाडा, धानोरा, सायखेडा, सायवाडा, पाळा-सालबर्डी आदी ठिकाणी वारकऱ्यांसाठी विविध धार्मिक कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत.
१६ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० ते ११.३० वाजता पाळा-सालबर्डी येथील श्री महालक्ष्मी धाम येथे काल्याचे कीर्तन, त्यानंतर दुपारी ३ वाजता वारीची सांगता होणार आहे. या भक्तिमय सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री बहिरम सेवा समितीने केले आहे.

No comments: