Header Ads

गर्भलिंग तपासणी प्रकरणात करवीर पोलिसांची धडक कारवाई; आरोपींच्या आणखी दोन गाड्या जप्त!

 गर्भलिंग तपासणी प्रकरणात करवीर पोलिसांची धडक कारवाई; आरोपींच्या आणखी दोन गाड्या जप्त!

~~~~~~~~~~~~~~~~~~~

कोल्हापूर | प्रतिनिधी

शशिकांत कुभार.

~~~~~~~~~±~±±~±~~

गर्भलिंग तपासणी प्रकरणात करवीर पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवत आरोपी स्वप्नील पाटील आणि त्याचा एजंट संतोष कोळी यांच्याकडून आणखी दोन वाहने जप्त केली आहेत. स्वप्नील पाटील याच्याकडून स्विफ्ट डिझायर, तर संतोष कोळी याच्याकडून ॲक्टीव्हा वाहन जप्त करण्यात आले.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान यापूर्वी आरोपींकडून वॅगनार कारही जप्त करण्यात आली होती. त्यामुळे गर्भलिंग तपासणीच्या कथित गैरप्रकारात वापरल्या जाणाऱ्या वाहनांवर करवीर पोलिसांनी कारवाईचा फास आणखी घट्ट केला आहे.

स्विफ्ट डिझायर, ॲक्टीव्हा आणि वॅगनार अशा तीन वाहनांच्या जप्तीमुळे या प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि आरोपींच्या हालचालींच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळण्याची शक्यता आहे.

गर्भलिंग तपासणीसारख्या गंभीर आणि बेकायदेशीर प्रकाराला आळा घालण्यासाठी करवीर पोलिसांनी केलेल्या या कारवाईकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Powered by Blogger.