राधानगरी तहसील कार्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात; तहसीलदार अनिता देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण
राधानगरी तहसील कार्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात; तहसीलदार अनिता देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण.
राधानगरी : देशभक्तीचा उत्साह आणि तिरंग्याच्या अभिमानाने राधानगरी तहसील कार्यालयाचा परिसर १५ ऑगस्ट रोजी दुमदुमून गेला. तहसील कार्यालयाच्या आवारात भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि उत्सवी वातावरणात साजरा करण्यात आला.
तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित शालेय विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत सादर केले. राधानगरी पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांना मानवंदना दिली.
या कार्यक्रमाला तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी-कर्मचारी तसेच राजकीय नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments: