शहीद जवानाच्या वीरपत्नीच्या हस्ते ध्वजारोहण; गुणवंत विद्यार्थ्यांसह कर्तृत्ववानांचा गौरव.
शहीद जवानाच्या वीरपत्नीच्या हस्ते ध्वजारोहण; गुणवंत विद्यार्थ्यांसह कर्तृत्ववानांचा गौरव.
म्हाळुंगे : करवीर तालुक्यातील म्हाळुंगे येथील श्रीमंत राजर्षी शाहू माध्यमिक विद्यालयात ८०वा भारतीय स्वातंत्र्य दिन देशभक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. निगवे गावचे सुपुत्र शहीद जवान संग्राम पाटील यांच्या वीरपत्नी हेमलता पाटील (ताई) यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शहीद जवानाच्या वीरपत्नीच्या हस्ते झालेल्या ध्वजारोहणामुळे कार्यक्रमाला विशेष भावनिक आणि प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले.
यावेळी माजी डीवायएसपी श्री. एस. एल. पाटील व सामाजिक कार्यकर्ते दीपक कोठावळे यांच्या माध्यमातून दहावी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या निरंजन पाटील, साक्षी पाटील, वैदही पाटील, जानकी पाटील आणि वर्षा चौगुले या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.तसेच शाळेचे माजी विद्यार्थी व म्हाळुंगे गावचे लोकनियुक्त सरपंच प्रमोद दिलीपकुमार पाटील यांची शेतकरी कामगार पक्षाच्या करवीर तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थी गणेश मोरे यांची महावितरणमध्ये विद्युत सहाय्यकपदी निवड झाल्याबद्दलही त्यांचा गौरव करण्यात आला.
शाळेला वेळोवेळी दातृत्वाची साथ देणारे म्हाळुंगे गावचे सुपुत्र सुभाष पाटील, प्रकाश परीट आणि माणिक कांबळे यांचाही शाळेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष दिविजय माणिकराव चव्हाण सरकार, उपाध्यक्ष रघुनाथ पाटील, श्रीमती अलका सुभाष पाटील, संचालक संगीता दिलीपकुमार पाटील, एम. के. पाटील, बंडोपंत पाटील, संग्राम पाटील, मुख्याध्यापक अनिल चौगुले तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी. डी. पाटील सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिन गुरव सर यांनी केले.

No comments: