Header Ads

जुन्या भांडणाचा राग; तरुणावर तलवार-एडक्याने जीवघेणा हल्ला, ९ जणांवर गुन्हा

 जुन्या भांडणाचा राग; तरुणावर तलवार-एडक्याने जीवघेणा हल्ला, ९ जणांवर गुन्हा.

----------------------------------------

कोल्हापूर | प्रतिनिधी : रहिम पिंजारी.

-------------------------------------------

राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या रागातून २९ वर्षीय तरुणावर नऊ जणांनी तलवार, एडका आणि दगडांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना १५ ऑगस्टच्या रात्री घडली.

रवी गोविंद कांबळे हे राजेंद्रनगर येथील लोखंडे वखार परिसरात मित्राच्या घरी जेवण्यासाठी गेले होते. यावेळी जुन्या वादातून संशयितांनी संगनमत करून त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत परिसरात दहशत निर्माण केल्याचा आरोप आहे.

हल्ल्यात रवी कांबळे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी त्र्यंबक गवळी, श्रीमंत गवळी, अमित गवळी, सुमित गवळी, सलीम शेख, सोन्या जगदाळे, कार्तिक बल्लाळ, शुभम उर्फ अक्षय मुळे आणि सचिन कांबळे उर्फ टिंग्या अशा नऊ जणांविरुद्ध राजारामपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतीय न्याय संहिता आणि भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

No comments:

Powered by Blogger.