संतप्त निषेध! केसरेकर हल्ला प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्या.
संतप्त निषेध! केसरेकर हल्ला प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्या.
--------------------------------------
कुपवाड | प्रतिनिधी
राजू कदम
--------------------------------------
कुपवाडच्या श्यामनगर येथे मोहन केसरेकर व त्यांच्या पत्नी मनीषा केसरेकर यांच्यावर झालेल्या भ्याड आणि अमानुष हल्ल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात मनीषा केसरेकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, मोहन केसरेकर हे गंभीर जखमी अवस्थेत मृत्यूशी झुंज देत आहेत.
या पार्श्वभूमीवर सामाजिक व राजकीय पदाधिकाऱ्यांनी मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन मोहन केसरेकर यांच्या प्रकृतीची माहिती घेतली, तसेच त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.
या घटनेतील आरोपीविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. आरोपीला कायद्याच्या चौकटीत कठोरातील कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मनीषा केसरेकर यांच्या हत्येचा तीव्र निषेध
मनीषा केसरेकर यांच्या निर्घृण हत्येचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. महिलांवर आणि नागरिकांवर अशा प्रकारे हल्ले करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
“मनीषाताईंच्या कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील,” असा निर्धार व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, या घटनेतील आरोपीवर कायदेशीर प्रक्रिया वेगाने राबवून दोष सिद्ध झाल्यास न्यायालयाने कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिकांमधूनही जोर धरत आहे.

No comments: