अनामिक दानशूरांचा शिक्षणाला हातभार; विद्या मंदिर सावर्डीत विद्यार्थिनींना स्कूल जॅकेटचे वाटप
अनामिक दानशूरांचा शिक्षणाला हातभार; विद्या मंदिर सावर्डीत विद्यार्थिनींना स्कूल जॅकेटचे वाटप.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~शाहुवाडी : समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ मिळत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. विद्या मंदिर सावर्डी येथे एका अनामिक देणगीदाराच्या सहकार्याने शाळेतील विद्यार्थिनींना दर्जेदार स्कूल जॅकेटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.कार्यक्रमात संजय पोवार यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत शिस्त, नियमितता, स्वावलंबन आणि चांगल्या संस्कारांचे महत्त्व पटवून दिले. समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होत असून, अशाउपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थिनींना दर्जेदार स्कूल जॅकेटचे वितरण करण्यात आले. जॅकेट मिळाल्यानंतर विद्यार्थिनींनी आनंद व्यक्त करत अनामिक देणगीदारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. शाळेच्या मुख्याध्यापकांनी, शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अनामिक देणगीदारांचे मनःपूर्वक आभार मानत त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या कार्याचे कौतुक केले.कार्यक्रमास मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments: