Header Ads

खुनाच्या गुन्ह्यातील फरार गुंडाला पोलिसांचा दणका! टोलनाक्यावर सापळा रचून लखन इसरडे जेरबंद; सांगली LCBची धडाकेबाज कारवाई

 खुनाच्या गुन्ह्यातील फरार गुंडाला पोलिसांचा दणका!टोलनाक्यावर सापळा रचून लखन इसरडे जेरबंद; सांगली LCBची धडाकेबाज कारवाई.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सांगली | प्रतिनिधी राजु कदम.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील परागंदा आरोपी लखन पंडीत इसरडे (वय ३५, रा. टिंबर एरिया, नवीन वसाहत, सांगली) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अखेर जेरबंद केले. म्हैसाळ रोड टोलनाका, मिरज येथे आरोपी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत ही कारवाई केली.

सांगली शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक २९०/२०२६ मध्ये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात लखन इसरडे हा निष्पन्न आरोपी असून, तो पोलिसांना चकवा देत फरार होता.

दरम्यान, ASI सुभाष सूर्यवंशी व पोलीस हवालदार संदीप नलावडे यांना आरोपी मिरज येथील म्हैसाळ रोड टोलनाक्यावर येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. ही माहिती वरिष्ठांना देण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या आदेशाने सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, ASI सुभाष सूर्यवंशी, पो.हवा. मुळे, पोलीस शिपाई विनायक सुतार व होळकर यांच्या पथकाने तातडीने सापळा रचला.

पोलिसांच्या सापळ्यात लखन इसरडे अलगद अडकला. त्याला ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी सांगली शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 फरार आरोपीचा अखेर ‘गेम ओव्हर’!

गंभीर गुन्ह्यानंतर पोलिसांना चकवा देत फरार असलेल्या आरोपीला गोपनीय माहितीच्या आधारे मिरजमध्ये पकडण्यात आल्याने सांगली LCBच्या कारवाईचे कौतुक होत आहे.

No comments:

Powered by Blogger.