ओतूर बाजारपेठेत दारू पिऊन दुचाकी चालवणाऱ्यास १० हजारांचा दंड.
ओतूर बाजारपेठेत दारू पिऊन दुचाकी चालवणाऱ्यास १० हजारांचा दंड.
ओतूर (प्रतिनिधी )-कैलास बोडके
ओतूर शहरातील बाजारपेठेत दारू पिऊन मोटारसायकल चालवणाऱ्या एका तरुणाला जुन्नर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास लहु बबन कोळपे वय २८ वर्षे, रा. वनकुटे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर हा त्याच्या ताब्यातील युनिकॉर्न मोटारसायकल क्र.एम एच १६ डी.जे.०९२७ ही दारू पिऊन ओतूर बाजारपेठेतून चालवत असताना आढळून आला.
या प्रकरणी त्याच्याविरुद्ध ओतूर पोलीस स्टेशनमध्ये मोटार वाहन कायदा कलम १८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार नामदेव बांबळे हे करीत आहेत.
दि. ७ ऑगस्ट रोजी आरोपी लहु कोळपे याला जुन्नर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १० हजार रुपये दंड ठोठावला.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, पोलीस हवालदार नामदेव बांबळे, संगीता दिघे, अतुल भेके आणि आशिष जगताप यांनी केली.
याबाबत बोलताना सपोनि ज्ञानेश्वर बाजगीरे म्हणाले, "बाजारपेठेसारख्या गर्दीच्या ठिकाणी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर वचक बसण्यासाठी अशी कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही दारू पिऊन वाहन चालवताना आढळल्यास अशाच प्रकारे कडक कारवाई केली जाईल."

No comments: