Header Ads

कर्तव्यावर असतानाच मृत्यू... महसूल विभागाने कुटुंबाला दिला आधार; पत्नीला अनुकंपा नियुक्ती, दोन लाखांची आर्थिक मदत!

 कर्तव्यावर असतानाच मृत्यू... महसूल विभागाने कुटुंबाला दिला आधार; पत्नीला अनुकंपा नियुक्ती, दोन लाखांची आर्थिक मदत! शाहुवाडी तहसील कार्यालयातील दिवंगत लिपिक मारुती मकर यांच्या कुटुंबाला महसूल प्रशासनाचा दिलासा~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

कोल्हापूर | प्रतिनिधी : विजय बकरे.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शाहुवाडी तहसील कार्यालयातील लिपिक मारुती मकर यांचे शासकीय कामानिमित्त मोटारसायकलवर प्रवास करत असताना झालेल्या अपघातात महिनाभरापूर्वी दुर्दैवी निधन झाले होते. या दुःखद घटनेनंतर महसूल विभागाने त्यांच्या कुटुंबाला मोठा आधार देत पत्नी काजल मारुती मकर यांची अनुकंपा तत्त्वावर शिपाई पदावर नियुक्ती केली आहे. तसेच दोन लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेशही प्रदान करण्यात आला.

महसूल दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात मा. जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्या हस्ते श्रीमती काजल मकर यांना नियुक्तीपत्र आणि दोन लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

या संपूर्ण प्रक्रियेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील महसूल अधिकारी-कर्मचारी तसेच कोल्हापूर जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत आवश्यक पाठपुरावा केला. दिवंगत मारुती मकर यांच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत आणि शासकीय नोकरी मिळवून देण्यासाठी संघटनेने विशेष प्रयत्न केल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

महसूल विभागाने संकटाच्या काळात कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला दिलेला हा आधार इतरांसाठीही संवेदनशील प्रशासनाचे उदाहरण ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

No comments:

Powered by Blogger.